संबंधित माहिती
- अभिनेत्री राधिका‘मिसेस अंडरकव्हर’ओटीटीवर झळकणार
- Gulshan Kumar Hanuman Chalisa :भारतात सर्वाधिक पाहिलेली हनुमान चालीसा, यूट्यूबवर व्ह्यूज अब्जावर पोहोचले
- Deepika Padukone: दीपिका पदुकोण ऑस्करसाठी रवाना, मस्त लूकमध्ये स्पॉट झाली
- ‘तू झूठी मैं मक्कार’ने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
- भाबी जी घर पर हैं फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रेचा घटस्फोट
दाक्षिणात्य अभिनेत्याचे चौथे लग्न
साऊथ सिनेसृष्टीतील स्टार नरेश चौथ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. तिसरी पत्नी रम्या रघुपतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने पवित्रा लोकेशसोबत लग्नगाठ बांधली आहे. नरेश आणि पवित्रा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केल्याचा आनंद चाहत्यांशी शेअर केला आहे. या जोडप्याला चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा मिळत आहेत.
तेलगू स्टार नरेश यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी लोकांचे आशीर्वाद मागणारे एक ट्विट शेअर केले आहे. ट्विटमध्ये अभिनेत्याने लिहिले, "आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांतता आणि आनंद मिळो यासाठी तुमचे आशीर्वाद मागतो...!" पुढे नरेश यांनी ओळींमध्ये लिहिले, 'एक पवित्र बंधन, दोन हृदये, तीन गाठी, सात पावले, तुझा आशीर्वाद मागतो - तुमचा नरेश.'
विशेष म्हणजे रम्या रघुपती ही नरेशची चौथी पत्नी आहे. यापूर्वी, अभिनेत्याने तीनदा लग्न केले होते आणि तिन्ही पत्नींपासून त्याला प्रत्येकी एक मूल आहे. नरेश यांनी पहिले लग्न ज्येष्ठ नृत्य गुरू श्रीनू यांच्या मुलीशी केले, ज्याच्यापासून त्यांना नवीन विजय कृष्ण हा मुलगा आहे. त्यानंतर त्यांनी प्रख्यात तेलगू कवी आणि गीतकार देवुलपल्ली कृष्ण शास्त्री यांची नात रेखा सुपिर्या हिच्याशी विवाह केला, ज्यांच्यासोबत त्यांना तेज नावाचा मुलगा आहे.
Seeking your blessings for a life time of peace & joy in this new journey of us
