सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (16:44 IST)

समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्यातील संबंधात दुरावा, घटस्फोट घेणार

साऊथची सुंदर अभिनेत्री सामंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सामंथाने नुकतेच तिचे आडनाव तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकले. सामन्थाने तिच्या नावापुढे अक्किनेनी काढून टाकले होते.
 
तेव्हापासून, अशी शक्यता वर्तवली जात होती की सामंथा आणि तिच्या पतीमध्ये काही मतभेद आहेत, ज्यामुळे अभिनेत्रीने तिचे आडनाव काढून टाकले. त्याचबरोबर आता सामंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सामंथा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नागा चैतन्यपासून  घटस्फोट घेण्याची माहिती दिली आहे. तसेच या कठीण काळात त्यांना समजून घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

सामंथा यांनी लिहिले, खूप विचारविनिमयानंतर मी माझ्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, आता आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही गेल्या दशकापासून चांगले मित्र आहोत. आताही आम्ही एक चांगले बंधन सामायिक करतो. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. आपल्या सहकार्यासाठी सर्वांचे आभार.
 
नागा चैतन्य हा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. त्याने 2001 मध्ये सामंथाशी लग्न केले. लग्नानंतर, अभिनेत्रीने तिचे नाव सामंथा रूथ प्रभूवरून बदलून सामंथा अक्किनेनी ठेवले.परंतु आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.