रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (09:27 IST)

Vedaa Teaser Out: ’वेदा चा धमाकेदार टीझर रिलीज

VEDAA
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या आगामी ‘वेदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जॉनसोबत शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जॉनच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत १९ मार्च रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज केला आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझर पाहून चाहते वेदच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
 
‘वेदा’ चित्रपटात जॉन अब्राहम जबरदस्त लूकमध्ये दिसला आहे. चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे, हे टीझर पाहून स्पष्ट होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना धोकादायक स्टंट आणि दमदार अ‍ॅक्शनचा भरघोस डोस मिळणार आहे. जॉनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘वेदा’चा टीझर शेअर केला आहे. जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा जबरदस्त अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
 
‘वेदा’मध्ये जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २०१९ साली आलेल्या अ‍ॅक्शन थ्रिलर ‘बाटला हाऊस’ नंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा दिग्दर्शक निखिल अडवाणीसोबत या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor