शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक हॉस्पिटलमध्ये

'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे अदा शर्मा स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर दुसरीकडे 'द केरळ स्टोरी'वरून बराच वाद झाला होता. त्यामुळे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यावर अतिरिक्त दबाव होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
 
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. आधी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर याला विरोध झाला होता. असे असूनही बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी'ची कमाई सुरूच राहीली.

सुदीप्तो सेन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप व्यग्र असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते आजारी पडले असल्याचे सांगतिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तणाव आणि सततच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या बातमीने चित्रपटाशी संबंधित लोक आणि चाहते अस्वस्थ झाले आहेत.