गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:10 IST)

नक्कीच फर्जीचा दूसरा सीझन येणार, पण कधी ते मलाही ठाऊक नाही

हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहिद आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. प्राइम व्हिडिओवरील सर्वात जास्त पाहिली गेलेली वेबसीरिज म्हणून ‘फर्जी’ने रेकॉर्डही केला आहे.
 
खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटबद्दल आणि एकूणच या गुन्ह्याबद्दल या वेबसीरिजमध्ये फार उत्तमरित्या भाष्य केलं गेलं आहे. शिवाय या सीरिजचे निर्माते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजशी याचं कनेक्शन जोडल्याने चाहते याच्या पुढच्या सीझनसाठी आणखीनच उत्सुक आहेत.
 
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान शाहिद कपूरने ‘फर्जी’च्या दुसऱ्या सीझनबद्दल भाष्य केलं आहे. शाहिद म्हणतो, “नक्कीच फर्जीचा दूसरा सीझन येणार, पण कधी ते मलाही ठाऊक नाही. अशा गोष्टींसाठी खूप वेळ लागतो. एखादी सीरिज शूट झाली की ती ३५ ते ४० भाषांमध्ये डब करून २०० पेक्षा अधिक देशात ती प्रदर्शित केली जाते, त्यामुळे यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा ‘फर्जी २’चं शूटिंग जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर वर्षभराने नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor