1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. This Marathi actress played a powerful role in Drishyam 3

दृश्यम ३ मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली दमदार भूमिका

सध्या अभिनेता अजय देवगण अभिनेता चित्रपट दृश्यम ३ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्री नेहा जोशीने देखील पोलीस इन्स्पेक्टर जेनी थॉमसची दमदार भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री श्रिया सरण, अभिनेत्री तब्बू, यांनी महत्त्वाची भूमिका साकारली असून नेहा जोशीने देखील दमदार अभिनय केलं आहे. या अभिनेत्रीने दृश्यम २ मध्ये देखील भूमिका साकारली होती आता ही दृश्यम ३ मध्ये देखील आहे. 
 अभिनेत्रीने अजय देवगण, तब्बू, जयदीप अहरावत, प्रकाश राज यांच्या सोबत काम केलं आहे. नेहा ने या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिचे नाव जेनी थॉमस आहे.  विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबियांवर लक्ष ठेवण्यासाठी ते विजय साळगांवकरच्या शेजारी राहण्यासाठी येते.जेनी विजयच्या घरात मायक्रोफोन लावून बोलणं ऐकते.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

तिने पोलीस गणवेशातील एक फोटो देखील शेअर केले आहे.या साठी तिनेअसिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टींग कॅप्शन लिहिलेले आहे. तिची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ती म्हणाली, दृश्यम ३ मध्ये मोठ्या कलाकारांच्या सोबत काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्या.
हा अनुभव खूपच छान होता या साठी मी दिगदर्शक अभिषेक पाठक यांचे मनापासून आभार मानते. हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की जावे. आणि चित्रपटाचा आनंद घ्यावे. 
पुढील लेख
बजेट ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम! अवघ्या ५ हजारांत फिरा कोकणातील ही ३ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे