शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वरूणने केले ‘जुडवा २’ चे पोस्टर रिलीज

अभिनेता वरूण धवनचा बहुचर्चीत ‘जुडवा २’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. वडील डेव्हिड धवन यांच्या ६५व्या वाढदिवसा दिवशी वरूणने हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. ‘जुडवा २’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात वरूण धवन डबल रोलमध्ये आहे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस व तापसी पन्नू या देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सलमान खानच्या हिट चित्रपटांपैकी एक असलेला ‘जुडवा’ च्या सिक्वल पोस्टरमध्ये वरूण दोन वेगवेगळ्या रुपांमध्ये टॅक्सीच्या बाहेर आलेला दिसत आहे.