गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (13:24 IST)

ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना पॉलिवूड म्हणजेच पंजाबी सिनेमाची हेमा मालिनी म्हटले जायचे. गायक मिका सिंगने दलजीत कौर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दलजीतने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दलजीतच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
 
दलजीतचे गुरुवारी, 17 नोव्हेंबर रोजी लुधियाना येथे तिच्या चुलत भावाच्या घरी निधन झाले. अभिनेत्रीचा चुलत भाऊ हरिंदर सिंग खंगुराच्या म्हणण्यानुसार, ६९ वर्षीय दलजीत गेल्या ३ वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी लढा देत असून त्या गेल्या 1 वर्षापासून कोमात होता. या अभिनेत्रीच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दलजीत कौर ही पंजाबी सिनेमाची शान होती. मामला गडबड है,पटोला, सईदा जोगन, सरपंच, सैदा जोगन, की बनू दुनिया दा, पुत जट्टां दे हे त्याच्या हिट चित्रपटांमध्ये आहेत.  
 
गायक मिका सिंगने दलजीत कौर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिकाने ट्विट करून लिहिले- एक सुंदर अभिनेत्री, पंजाबची दिग्गज दलजीत कौर आता आपल्यात नाही.त्यांच्या  आत्म्याला शांती लाभो
 
दलजीत कौर यांनी दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1976 मध्‍ये 'दाझ' या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.दिलजीतने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पती हरमिंदर सिंग देओलच्या अपघातानंतर दलजीतने चित्रपटातून ब्रेक घेतला होता.  सिंग व्हर्सेस कौर या चित्रपटात दिलजीतने गिप्पी ग्रेवालच्या आईची भूमिका साकारली होती. 

Edited By- Priya Dixit