सोमवार, 19 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (16:44 IST)

‘कहानी 2:दुर्गा रानी सिंह’ चा ट्रेलर रिलीज

vidya abalan
अभिनेत्री विद्या बालनच्या ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये विद्या बालन अतिशय दमदार भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ चा सिक्वेल आहे. चित्रपट येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विद्या ‘वॉण्टेड क्रिमिनल’ च्या भूमिकेत दिसणार आहे. यात अपहरण आणि हत्याच्या आरोपात पोलिस विद्याच्या मागावर आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात विद्यासह अर्जुन रामपाल आणि जुगल हंसराज प्रमुख भूमिकेत आहेत.