रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (10:20 IST)

Vikrant Massey: मिर्झापूर फेम अभिनेता विक्रांत मॅसी होणार बाबा, पत्नी शीतल ठाकूरने दिली गुड न्युज!

Vikrant Massey
Vikrant Massey: मिर्झापूर फेम अभिनेता विक्रांत मॅसी लवकरच वडील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याची पत्नी शीतल ठाकूर गर्भवती आहे. विक्रांत मेसी आणि शीतल ठाकूर आई-वडील होणार आहेत.
 
चिमुकल्यांच्या रडण्याचा आवाज लवकरच त्यांच्या दोन्ही घरात गुंजणार आहे. चाहते आता खूपच उत्सुक दिसत आहेत. प्रत्येकजण या बाळाच्या जगात येण्याची वाट पाहत आहे. तसेच, हे जोडपे त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा कधी करणार याचीही चाहते वाट पाहत आहेत.
 
विक्रांत मॅसी हे टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक सुपरहिट शो दिल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. काही वेळातच विक्रांत वेब सीरिजच्या जगातही प्रसिद्ध झाला. रसिकांच्या पसंतीस पडलेल्या 'मिर्झापूर'मधील बबलू पंडितच्या भूमिकेतून त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. थप्पड, छपाक आणि हसीन दिलरुबा यांसारख्या चित्रपटांमुळे विक्रांत मॅसीला अधिक प्रसिद्धी मिळाली.
 
 विक्रांत आणि शीतल ठाकूर 2015 पासून एकमेकांना ओळखत होते. जवळपास 4 वर्षे डेट केल्यानंतर 2019 मध्ये दोघांनी इंटिमेट पद्धतीने एंगेज केले होते. यानंतर दोघांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केले. आता तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या घरून आनंदाची बातमी आली आहे.या जोडप्याने अद्याप या गुड न्यूजला दुजोरा दिलेला नाही किंवा त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
 
 Edited by - Priya Dixit