सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (19:57 IST)

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

vikrant messy
Instagram
12वी फेल' या चित्रपटाच्या अफाट यशानंतर विक्रांत मॅसी चर्चेत आला आहे. अभिनेता विक्रांत हा केवळ त्याच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. यावर्षी, 2 फेब्रुवारी 2024 रोजी, विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. विक्रांत मॅसीची पत्नी शीतल ठाकूरने विक्रांतचा मुला वरदान सोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये वरदान मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. या फोटोच्या माध्यमाने तिने वरदानची झलक दाखवली आहे. 

 विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पती विक्रांत मॅसी आणि मुलगा वरदान चे अनेक फोटो शेअर केले आहे. अभिनेता विक्रांत सूर्यास्ताच्या वेळी आपल्या मुलासोबत वेळ घालवताना दिसत आहे. दुसऱ्या चित्रात अभिनेता मुलासोबत खेळताना दिसत आहे. 
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांत मॅसी त्याचा आगामी चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' च्या रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राशी खन्नाही आहे. '12वी फेल'च्या प्रचंड यशानंतर विक्रांत मॅसी राजकुमार हिराणीसोबत त्याचा पुढचा प्रोजेक्ट करणार आहे.
 
 
Edited By- Priya Dixit