मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (12:31 IST)

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोमवारी त्याला मुंबईतील वर्सोवा स्मशानभूमीत दफन करण्यात  आले. कुटुंब ह्या धक्क्यातून सावरलेले ही नाही तर वाजिदची आई रजिना खान यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आणि त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
 
वाजिद खान मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्रस्त होते. नंतर त्याला कोरोनाची लागणही झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार, वाजिदच्या आईला रुग्णालयात मुलाच्या देखभाल दरम्यान कोरोना संक्रमण झाले. रजिना खानला मुंबईतील सुराणा सेठिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात वाजिद खान यांनाही दाखल करण्यात आले होते.