शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (12:21 IST)

अनुष्काची भन्नाट पोस्ट, नेटकऱ्यांना केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

गरोदर अनुष्का शर्मा सध्या हा काळ आनंदाने घालवत असून अधून-मधून स्वत:बद्दल आपल्या चाहत्यांसाठी काही न काही शेअर करत असते. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक जुना फोटो पोस्ट केला असून त्याला दिलेले कॅप्शन फारच मजेशीर आहे. 
 
या पोस्ट केलेल्या फोटोत ती एका खुर्चीवर दोन्ही पाय पोटाजवळ घेऊ बसलेली आहे आणि आनंदाने खात असल्याचे दिसून येत आहे. त्यावर तिने कॅप्शन ‍दिले आहे की ‘जेव्हा मी अशाप्रकारे बसूही शकत होती आणि खाऊ शकत होती. पण आता मी असं बसू शकत नाही पण खाऊ नक्की शकते’. असं मजेशीर कॅप्शन बघून दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे.
 
जानेवारी २०२१ मध्ये अनुष्का-विराटच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.