मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:23 IST)

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता शेट्टी या सीजनचं विजेतेपद पटकावेल. आता काही दिवसांनी बिग बॉस 15 चा फिनाले होणार आहे, अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टी शिर्डी येथे दर्शनासाठी पोहोचली आहे. फिनालेपर्यंत शिल्पा कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.शिल्पा शेट्टी सतत बहिणीच्या समर्थनात असते. ती दररोज आपल्या बहिणीशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.
 
त्याच वेळी, ती तिच्या चाहत्यांना विनंती करत आहे की त्यांनी शेवटपर्यंत असेच प्रेम ठेवावे. शिल्पा यावेळी पती राज कुंद्रासोबत अनेक देवस्थानांमध्ये दर्शन घेताना दिसली. पण यावेळी शिल्पासोबत आणखी एक व्यक्ती  दर्शनासाठी आला होता.
 
शिल्पाच्या गाडीतून प्रवास करत तो शिर्डीला ही दर्शनासाठी पोहोचला होता. राज कुंद्रापेक्षा सध्या या व्यक्तीची सर्वात जास्त चर्चा होत आहे.  शिल्पा आणि राजीवचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
 
शिल्पा शेट्टी आणि राजीव अडातिया यांनी शिर्डी यात्रेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राजीव हा बिग बॉसमधील स्पर्धक आहे. तो शमितासोबत बिग बॉसच्या घरात सामील झाला होता.  राजीवने वाईल्ड कार्डच्या मदतीने या शोमध्ये एंट्री घेतली.
 
शमिता शेट्टीने राजीवला राखी बांधून भावाचं स्थान दिलं आहे. त्यामुळे शिल्पासाठी देखील राजीव हा छोट्या भावाप्रमाणे आहे. तिघांचे बरेच फोटो आतापर्यंत समोर आलेले आहेत.