1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2015 (12:19 IST)

अक्षय पगडीवर फिदा

अक्षय कुमार
अक्षय कुमारच्या आगामी सिंग इज ब्लिंग चित्रपयातलं टुंग टुंग हे गाणं सध्या खूप गाजतंय. काही तासांतच सोशल मीडियावर या गाण्याला भरपूर हिट्स मिळाले. गाण्यामध्ये चमकलेल्या सरदारजी मंडळींनी चक्क 90 किलोंची पगडी डोक्यावर घातलीय असं म्हटलं जात होतं. पण ही माहिती थोडी चुकीची असल्याचं खुद्द ‍अक्षय कुमारनं सांगितलं. तो म्हणाला की या गाण्यात त्यांनाही विशेष पगडी घातली आहे. पण तिचं वजन 90 नव्हे तर 56 किलो होतं. 
 
आपल्या देशात अशी ही काही मंडळी आहेत, जी दिवसभर त्यांच्या डोक्यावर एवढी वजनदार पगडी घेऊन मिरवतात. केवळ झोपण्याच्या वेळेला ते ही पगडी डोक्यावरून खाली उतरवतात. खरंच मला या लोकाचं कौतुक वाटतं.