अजय-अतुलच्या गाण्यावर करिनाचा ठुमका
अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘ब्रदर्स’ या चित्रपटातील आयटम साँग रिलीज झाले असून या गाण्याला मराठीतील प्रसिद्ध आणि आघाडीचे संगीतकार अजय-अतुलचे संगीत आहे. तर पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये अभिनेत्री करिना कपूर दिसणार आहे.
या गाण्याचे बोल ‘मेरा नाम मेरी’ असे असून ब्रदर्समधील या गाण्याला ‘जत्रा’या मराठी चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्याची चाल वापरण्यात आली आहे. हा चित्रपट 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉरियर या हॉलिवूडपटाचा हा रिमेक आहे.

