1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2015 (11:15 IST)

अभिनेत्री मिनीषा लांबाचं शुभमंगल

मिनीषा लांबा
बचना ऐ हसिनो, हनीमून ट्रॅव्हल्ससारख्या चित्रपटातून गाजलेली अभिनेत्री मिनीषा लांबा विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड रायन थामसोबत तिने एका छोटेखानी समारंभात लगीनगाठ बांधली. जुहूच्या सी प्रिन्सेस हॉटेलमधील मुंबई नाईटक्लब ट्रायोलॉजीचा मालक असलेला रायन आणि मिनीषा गेल्या 2 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. 
 
2013 मध्ये मित्रांच्या ओळखीतून दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांचे मित्र सांगतात. मिनीषा लांबा आणि रायनच्या लग्नाची बातमी अभिनेत्री पूजा बेदीने ट्विटरच्या माध्यमातून सर्वासमोर आणली. मिनीषा गेल्या वर्षी बिग बॉसमध्ये दिसली होती. अभिनेता आर्य बब्बरसोबत तिचं नाव जोडलं जात होतं. एका पंजाबी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिनीषासोबत प्रेमसंबंधात असल्याची कबुली आर्यने दिली होती.