गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2015 (11:05 IST)

इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’चा फर्स्ट लुक

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनित आणि इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रसिद्ध झाला असून हा लुक एका आघाडीच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 
इम्तियाज अलीने रणबीर आणि त्याची पूर्व प्रेयसी दीपिका पदुकोण यांना दुसर्‍यांदा एकत्र आणले असून या दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर ते पहिल्यांदा एकत्र काम करीत आहेत. ‘तमाशा’ चित्रपटाचे शूटिंग क्रोशियामध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयी काहीच कळू शकलेले नाही. दीपिका आणि रणबीरने इम्तियाज अलीच्या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. ‘लव्ह आज कल’ आणि ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून या दोघांनीही भूमिका केल्या होत्या पण आता या दोघांना एकत्र आणण्यात इम्तियाज यशस्वी ठरला आहे. 27 नोव्हेंबरला ‘तमाशा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे