उपचारासाठी माधुरी दीक्षित अमेरिकेला रवाना
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. टीव्हीवरील रिअॅलिटी शोच्या शूटींगमधून सुट्टी घेवून उपचारासाठी माधुरी मागील आठवड्यात अमेरिकेत गेल्याचे समजते.
माधुरी दीक्षित मागील अनेक दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होती. वेदना सहन करण्यापलिकडची झाल्यामुळे तीने अमेरिकेला जावून उपचार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी माधुरीने खांदेदुखीमुळे शूटींगमधून मोठी सुट्टी घेतली.
चाहते तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

