ऐश्वर्याने घेतला 21 कोटींचा फ्लॅट
माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एका लक्झरी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये 21 कोटी रुपयांना नुकताच एक फ्लॅट खरेदी केला आहे. बीकेसीतल्या ‘सिग्निया आयल्स’मधल्या या फाइव्ह बेडरूमच्या आलिशान फ्लॅटचं क्षेत्रफळ तब्बल 5,500 चौ.फूट असून त्यात सर्व सोयीसुविधा आहेत. गेल्याच आठवडय़ात या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं. 38,000 रु. प्रति चौ.फूट अशा दराने खरेदी-विक्रीचा हा व्यवहार झाला. सनटेक रियल्टीचे सिग्नेचर आयलंड, सिग्निया आयल्स आणि सिग्निया पर्ल असे तीन टॉवर्स आजूबाजूला आहेत. त्यातल्या सिग्निया आयल्समध्ये ऐश्वर्याने घेतलेला फ्लॅट आहे. अलीकडेच सोनम कपूरने सिग्नेचर आयलंडमध्ये डय़ुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं आहे. 7,000 चौ.फुटांच्या या डय़ुप्लेक्स अपार्टमेंटसाठी सोनमने 35 कोटी मोजले. हे तेच अपार्टमेंट आहे ज्यात काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश बँकर उदय कोटक यांनी सोनमसारखंच घर खरेदी केलं आहे. 2013 मध्येही याच बिल्डिंगमध्ये सिटी ग्रुपचे माजी अध्यक्ष विक्रम पंडित आणि डॉईश बँकेचे एशिया/पॅसेफिकचे को-एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गुनीत चढ्ढा यांनी घर घेतलं होतं.

