कतरीनाला किस करायला या हीरोने दिला नकार
सुंदर कतरीना कैफ हिला किस करायला या हीरोने नकार दिला आहे. त्याचे म्हणणे आहे की आता असे सीन देणे शक्य नाही. हीरोने सरळ सीन बदलण्याची मागणी केली. शेवटी दिग्दर्शकाकडे सीन बदलण्याऐवजी काही पर्याय नव्हता.
कोण आहे हा हीरो???
त्या हीरोचे नाव आहे रणबीर कपूर, ज्याचे कतरीनाशी ब्रेकअप झाले आहे. आता रणबीर कतरीनासोबत कुठलेही किसिंग किंवा इंटीमेट सीन देयला तयार नाही. हा सगळा प्रकार बघून दिग्दर्शक अनुराग बसु तर आता त्या मुहूर्ताला दोष देत आहे जेव्हा त्यांनी 'जग्गा जासूस' सुरू केली होती कारण काही केल्या चित्रपट पूर्ण व्हायची चिन्हे दिसतंच नाहीये.
सध्या जग्गा जासूसची शूटिंग मोरोक्को येथे होत असून तिथे पोहचण्यासाठी कतरीना आणि रणबीरने वेगळी-वेगळी फ्लाईट पकडली. ते सतत एकमेकासमोर येणे टाळत असून कसे ही करून बस शूटिंग संपवायची हा दोघांच ध्येय आहे.

