कमबॅकसाठी तयार मनीषा कोइराला
कर्करोगावर मात करून अभिनेत्री मनीषा कोइराला आता कमबॅकसाठी तयार झाली आहे. तिने ‘Oru Melliya Kodu’ या तमिळ सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. सिनेमाचे काही ऑन-लोकेशन फोटो समोर आले आहेत. एका फोटोमध्ये मनीषा दाक्षिणात्य अभिनेता शमशुद्दीन इब्राहिमसोबत लग्नच्या मंडपात बसलेली दिसतेय.
सिनेमामध्ये दोघांचे काही बोल्ड सीन्ससुध्दा आहेत. सोबतच एका फोटोमध्ये मनीषा चाकूसोबत पोज देताना दिसत आहे. कन्नडी आणि तमिळ सिनेमाचे दिग्दर्शक एमआर रमेशचा हा सिनेमा हायप्रोफाइल सुनंदा पुष्कर मर्डर केसवर आधारित आहे. सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे.