करण आहे फवादची ‘मेहबूबा’: अभिजित
आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात गायक अभिजित भट्टाचार्य असतो. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची निर्माता दिग्दर्शक करण जोहर ही मेहबूबा असल्याचे विचित्र ट्विट त्याने करुन खळबळ उडवून दिली आहे.
भारतातून पाकिस्तानी कलाकारांना हाकलल्यानंतर ‘ये दिल है मुश्किल’ चित्रपटावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. त्याला चित्रपटातून वगळा अशी मागणी मनसेकडून होत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्यामुळे त्याला वगळणे मुश्कील आहे. दरम्यान ‘कॉफी विथ करण’ हा टीव्ही शो पुन्हा सुरू होणार आहे. याचा पहिला भाग फवाद खान याला घेऊन करणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होती. मात्र करण जोहरने ही बातमी नाकारली आहे. कॉफी विथ करणमध्ये फवाद खान नसेल हे त्याने जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर अभिजित भट्टाचार्यने ट्विट करुन नवा वाद उकरुन काढला आहे. पुन्हा एकदा लव्ह जिहाद, मेहबूबा करण जोहर डिप्रेशनमध्ये पाकचा प्रियकर फवादने बिचार्या मिसेस करण जोहरला धोका दिला, अशा अर्थाचे टिट अभिजित भट्टाचार्यने केले आहे.
अभिजितच्या या ट्विटचे पडसाद बॉलिवूड वतरुळात निश्चितच उमटणार असे दिसते. याला करण आणि धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित कलाकार कसे प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

