1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. कॅटरिनाचा ‘डाएट प्लॅन’ बदलतो चित्रपटानुसार

कॅटरिनाचा ‘डाएट प्लॅन’ बदलतो चित्रपटानुसार

बी-टाऊनची सध्याची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या सुडौल बांध्याचे रहस्य उलगडले असून मी माझा डाएट आणि फिटनेस चित्रपटांच्या मागणीनुसार प्लॅन करत असल्याचे कॅटरिनाने म्हटले आहे.
 
फिटनेस स्पेशालिस्ट यास्मिन कराचीवाला आणि झिना ढल्ला यांच्या ‘स्कल्प्ट अँण्ड शेप’ पुस्तकाचे नुकतेच अनावरण झाले. त्यावेळी कॅटरिना बोलत होती. यावेळी मला काय साध्य करायचे आहे, मी कोणत्या प्रकारचा चित्रपट करत आहे यावर माझे डाएट आणि फिटनेस अवलंबून असतो. चित्रपटाची मागणी कोणत्या प्रकारची आहे, अगदी साधी भूमिका आहे, की ग्लॅमरस किंवा अँथलेटिक लुक हवा त्यानुसार डाएट सुरू करायचा, असे कॅटरिना म्हणाली. पुढे ती म्हणाली की, मी अगदी साधेसरळ खाणे खाते. आरोग्यासाठी कोणते खाद्य योग्य आहे हे आपल्याला माहीतच असते.