जॅकलिन आणि अर्जुननमध्ये काय शिजतंय?
बॉलीवूडमध्ये सध्या एका नव्या जोडप्याची चर्चा जोरावर आहे. हे नवं जोडपं आहे अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस..‘आयफा’ अँवॉर्डच्या मलेशिया ट्रीपदरम्यान या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करताना पाहिलं गेलं. त्यानंतर या दोघांत काहीतरी शिजतंय अशी अटकळ बांधली जातेय.
अर्जुनच्या वाढदिवशीही जॅकलिन सेलिब्रिट करताना दिसली होती. यावेळी, तिची अर्जुनच्या बहिणीशी चांगलीच गट्टी जमलेली दिसत होती. याबद्दलच जेव्हा जॅकलिनला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं, अर्जुन आणि मी खूप चांगले मित्र असल्याचं म्हटलंय. मी आजकाल हे सगळं ऐकते आणि फक्त हसते.. न्यूजपेपर तर मी वाचतही नाही. माझे आजूबाजूचे लोकच मला माहिती देत असतात असं तिनं म्हटलंय.
तसं अर्जुनच नाव आतापर्यंत सोनाक्षीपासून ते मलाईका अरोरा खान हिच्यापर्यंत अनेक जणींशी जोडलं गेलंय. यात आता आणखी एक भर पडलीय.
