1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. धूमधडाका ‘भज्जी-गीता’च्या लग्नाचा!

धूमधडाका ‘भज्जी-गीता’च्या लग्नाचा!

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री गीता बासरा यांनी 1 नोव्हेंबरला दिल्ली येथे लग्नाच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनला भारतीय क्रिकेट संघ हजर राहणार असून पंजाबी पद्धतीने 5 दिवस हरभजन सिंग आणि गीता बासरा यांचे लग्न धूमधडाक्यात होणार आहे. 
 
मूळची लंडनची असणार्‍या गीताचे वास्तव्य सध्या मुंबईत आहे. तिने मुंबईतील एका डिझायनरवर सर्व खरेदीची जबाबदारी सोपवली आहे. तिच्या परिवारातील सर्व सदस्य लवकरच लंडनहून मुंबईला येणार आहेत. पाच दिवस चालणार्‍या विवाह समारंभात चुडा समारंभ, संगीत असे पारंपरिक पंजाबी विधी पार पडणार आहेत. 
 
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा विवाह सोहळा पार पडेल. भारतीय क्रिकेट संघ या काळात कसोटी मालिका खेळणार असून 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सामना नाही.  त्यामुळे 1 नोव्हेंबरला संघ लग्नाच्या समारंभात हजर राहू शकतो.