परदेशात यामीचे हॉर्स रायडिंग
अलीकडेच कॅनडामध्ये यामी गौतम तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. यावेळी यामीला चित्रपटातील एका दृश्यासाठी हॉर्स रायडिंग करावे लागणार होते. यामीला यापूर्वी हॉर्स रायडिंगचा कुठलाही अनुभव नव्हता.
भविष्यात हॉर्स रायडिंगची आवश्यकता भासेल असे तिला कधी वाटले नव्हते मात्र चित्रपटात हॉर्स रायडिंग करणे या पात्राची गरज होती त्यामुळे यामीने कमी दिवसांमध्ये हॉर्स रायडिंग तंत्र शिकून घेतले.
चित्रपटात यामीच्या हॉर्स रायडिंगमध्ये सहजता दिसणे आवश्यक होते. कॅङ्केर्यासमोर सीन देताना चेहर्यावर गोंधळल्याचे भाव नको होते. घोड्याबरोबरचे दृश्य मोठे नव्हते पण घोड्याला नियंत्रित कसे करतात हे शिकणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते. यामीला मदत करण्यासाठी सेटवर व्यावसायिक प्रशिक्षक होता. यामीने त्याच्याकडून घोड्यावर बसून रपेट मारण्याचे त्याला नियंत्रित करण्याचे तंत्र कमी वेळात शिकून घेतले आणि हॉर्स रायडिंगचे दृश्य अगदी सहजतेने दिले. यामीला याबद्दल विचारले तेव्हा तिने या वृत्ताला दुजोरा दिला.
त्या घोड्याचे नाव टर्की होते. टर्कीला नियंत्रित करणे सोपे नव्हते. मी त्याच्याबरोबर
मैत्री केली आणि त्यानंतर काम सोपे झाले असे यामीने सांगितले.