1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2015 (10:13 IST)

प्रियंका चोप्रा करणार लग्न?

priyanaka chopra
प्रियंका चोप्रा हिचे नाव अनेक को-स्टारशी जोडले गेले आहे. तिचे त्यांच्या तुटलेल्या नात्यांबद्दलही अनेकांना माहीत आहे. असीम मर्चड, शाहिद कपूर, हर्मन बावेजा यांच्याशी संबंध असल्याच्या हेडलाइन्सही आल्या होत्या. पण आता बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये गेलेल्या पिगी चोपडाला तिथेच कोणीतरी दुसरा मिळाला आहे. सध्या ती क्वान्टिकोच्या शुटिंगसाठी अमेरिकेत आहे. त्या ठिकाणी तिला नवा बॉयफ्रेंड मिळाला आहे. हो तुम्ही ऐकले हे खरे आहे. पिगी चोप्राचे सध्या लॉस एन्जेलिस येथील एका तरूणाच्या प्रेमात पडली आहे. तिला आता स्थिर रिलेशनशीप हवे आहे. या व्यक्तीला जगासमोर यायचे नाही.
 
अजून ती त्याच्यासोबत कोणाला दिसली नाही. पण प्रियंका त्याच्यासोबत डेटिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. प्रियंका चोपडा या तरूणाशी लग्न करणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. पण अद्याप याबद्दल काही अधिकृत काहीच कळाले नाही. पण ही अफवा क्वॉन्टिकोच्या प्रमोशनसाठी आहे का, बाजीराव मस्तानीच्या प्रमोशनसाठी आहे हे समजून शकले नाही.