शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (10:48 IST)

बिपाशा झाली नाराज

बिपाशा बासू
सेलिब्रेटी कपल्सच रिअँलिटी शोसाठी नाव चर्चेत आल्याने बॉलीवूडची हॉट, मादक अभिनेत्री बिपाशा बासू सध्या माध्यमांवर नाराज झाली आहे. करण सिंग ग्रोव्हरसोबत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिपाशाला विचारणा झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. 
 
या अशा प्रकारच्या बातम्यांना बिपाशा वैतागली असून आपल्याला अशा कार्यक्रमाशी काही देणेघेणे नसल्याचे तिने जवळच्या व्यक्तींशी बोलताना सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी आपल्या नावाचा वापर केला जात असल्याची भावना तिने बोलून दाखवली.
 
अलोन चित्रपटासाठी चित्रीकरण दरम्यान बिपाशा आणि करणमध्ये मैत्रीचे बंध जुळले. ही मैत्री उत्तरोत्तर अधिक घट्ट झाली. तेव्हापासून बिपाशाचे नाव करणशी जोडले जात आहे. मात्र दोघांनी वेळोवेळी प्रेमसंबंधाचा इन्कार केला आहे. या आगामी सेलिब्रिटी कपल्स रिअँलिटी शोमध्ये प्रत्येक जोडीला वेगवेगळी आव्हाने दिली जातील. ज्यात प्रत्येक टप्प्यांवर त्यांच्या नात्याची परीक्षा होईल. या कार्यक्रमाबद्दल बिपाशाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण तिच्या प्रवक्त्याने सांगितले की, या वृत्तात अजिबात तथ्य नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचा बिपाशा कधी विचारही करू शकत नाही.