1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. बॉलीवूड कलाकरांचा भारतीय सैन्याला सलाम

बॉलीवूड कलाकरांचा भारतीय सैन्याला सलाम

स्वातंर्त्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि प्रत्येक विविध माध्यमातून त्यांचं देशप्रेम व्यक्त करत आहेत. अगदी सामान्य नागरिक ते बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचं देशप्रेम दाखवत आहेत. बॉलीवूड किंग शाहरुख खानने भारतीय लष्कराला सलाम करताना मंगळवारी ट्विटरवर एक सेल्फी शेअर केली. शाहरुखने सेल्फीसोबत लिहिलं आहे की, आपलं संरक्षण करणार्‍या सैन्याला माझा सलाम. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देश, नागरिक आणि आपल्या कुटुंबीयाचे संरक्षण करणार्‍या लष्कराला सलाम, असं शाहरुखने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 
 
भारतीय लष्कराला सलाम करण्यासाठी रिलायन्स ग्रुपने सॅल्यूट सेल्फी मोहीम सुरू केली. त्याला बी-टाऊनच्या SaluteSelfie हा हॅशटॅग करून शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शाहिद कपूर आणि अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.