1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही: सनी लिऑन

मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही: सनी लिऑन

Bollywood Gossip In Marathi
बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिऑन सध्या अनेक सिनेमांमध्ये व्यस्त आहे. अनेक सिनेमांची रांग तिच्यासमोर लागली आहे. सनी लिऑन बॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, तरीही तिच्या भूतकाळाविषयी तिला प्रश्न विचारलाच जातो. मुलाखतीत असाच प्रश्न विचारला असता सनी लिऑनने अतिशय सौम्य शब्दात स्पष्टीकरण दिलं. माझा भूतकाळ मी बदलू शकत नाही. कारण ते माझ्या हातात नाही. मात्र, बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून मी माझी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

2012 साली जिस्म 2 मधून सनी लिऑनने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सनी लिऑनचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकले नाहीत, मात्र तरीही सनी लिऑनला सिनेमात घेण्यास निर्मात्यांची रांग लागली आहे.