1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. मोठ्या पडद्यावर ऐश्वर्याचं कमबॅक

मोठ्या पडद्यावर ऐश्वर्याचं कमबॅक

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनच्या पुनरागमनाकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ऐश्वर्या आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जज्बा’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
 
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने ब्रेक घेतला होता. काही जाहिराती आणि फॅशन शोमध्ये ऐश्वर्याचं दर्शन घडलं तरी मोठ्या पडद्यावर तिला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हृतिकसोबत केलेल्या ‘गुजारिश’ चित्रपटानंतर तब्बल 5 वर्षाच्या अंतराने ऐश्वर्या पुनरागमन करत आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जज्बा’ हा चित्रपट क्राईम स्टोरी असल्याचं म्हटलं जातं. गुप्ता यांनी ट्विटरवरुन चित्रपटाचं पोस्टर लाँच केलं. 
 
विशेष म्हणजे ऐश्वर्याचं बॉलीवूडमधील पदार्पण असलेला ‘और प्यार हो गया’ हा 1997 मध्ये याच तारखेला प्रदर्शित झाला होता. ‘जज्बा’ चित्रपटात शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंग यांच्याही भूमिका आहेत. ‘जज्बा’ 9 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.