राधिकाचा मांझी द माउंटनमॅन चा ट्रेलर हिट
मराठी अभिनेत्री राधिका आपटेला 'मांझी: द माउंटेन मॅन' या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर दोन दिवसांपूर्वी लॉन्च झाला. हा ट्रेलर युट्यूबवर व्हायरल झाल्याने त्याला काही मिनिटांतच लाख हिट्स मिळाल्या आहेत.
मराठी अभिनेत्री राधिका आपटे या चित्रपटात नवाझुद्दीनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. 1960 मध्ये ही घटना बिहारमधील गयाजवळ घडली आहे. गावासाठी अडथळा बनलेल्या डोंगरावरून जाताना त्याच्या पत्नीला अपघात होतो. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा पती म्हणजे मांझी कुणाच्याही मदतीशिवाय एक अख्खा डोंगर फोडून काढतो.
