सईच्या हंटरचा सिक्वेल
मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हंटर’ या चित्रपटात आपल्या समाजामध्ये ज्या गोष्टी बोलणे चुकीचे आहे, त्या गोष्टींना बोल्डचा टॅग दिला जातो. पण त्या गोष्टीही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात हाच मुद्दा अतिशय सहजतेने हाताळला गेल्यामुळेच प्रौढ कॉमेडी असलेल्या ‘हंटर’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार सध्या विचाराधीन आहे.
मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. यामध्ये वासू नावाच्या एका अविवाहित मुलाची भूमिका अभिनेता गुलशन दैवय्याने साकारली होती. आता दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी ‘हंटर’च्या सिक्वेलवर काम करत असल्याचे समजते. सिक्वेलचे
कथानक एका तरुणीच्या दृष्टिकोनातून मांडले जाणार असून मूळ सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादावरुनच याच्या सिक्वेलची कल्पना दिग्दर्शकाला सुचल्याचे समजते.