1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2015 (10:37 IST)

सनी लिऑनला देशाबाहेर काढा

sunney leon
नेहमीच वादात असणारी राखी सावंत नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही न काही प्रयत्न करत असते. नुकतंच राखीनं आपण इंद्राणी मुखर्जीची आवडती अभिनेत्री, मैत्रीण असल्याचं सांगितलं आणि चर्चेत आली.
 
राखी अशी अभिनेत्री आहे जिला तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखलं जातं. राखी सावंत नेहमीच सनी लिऑनवर हल्लाबोल करत असते. सनी लिऑनच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे देशात बलात्काराच्या घटना वाढल्या, असं सीपीआय नेते अतुल अंजन यांनी म्हटलं होतं. आता या वक्तव्यावर आता राखीही बोललीय. सनी लिऑनच्या हॉट नंबर्समुळे लोकं असा र्दुव्‍यवहार करण्यासाठी धजावतात, असं राखी म्हणालीय. सनी लिऑनला भारतात काम करू देऊ नये, तिला देशातून हाकलून द्यावं. यापूर्वी राखीनं सनीला टार्गेट केलं होतं.