1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2015 (10:12 IST)

सलमान खान लग्न करणार नाही!

सलमान खान
बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान लग्न करणार नाही? हा प्रश्न पुन्हा पडण्याचे कारण पन्नास वर्षीय सलमानला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सलमान म्हणाला, शादी कॅन्सल, लव्ह इज बॅक ऑन. या उत्तरानंतर सलमान खान लग्न करणार नाही का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे. शिवाय, अफेअर सुरू असल्याचेही बोलले जात असे. मात्र, सलमानने नेहमीच त्याच्या लग्नाबाबत उघडपणे बोलणं टाळलं आहे.
 
लग्नाबाबत जेव्हा कधी सलमानला प्रश्न विचारला जातो, त्या त्या वेळी सलमान तो प्रश्न जाणीवपूर्वक टाळतो. आता मात्र सलमानने पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे तो आता तरी लग्न करणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. जेव्हा सलमानला लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला त्यावेळी शादी कॅन्सल, लव्ह इज बॅक ऑन असे उत्तर दिले. त्यामुळे आणखीच चर्चा सुरू झाली आहे.