सैफची कन्या करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण!
विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूर दिसणार असल्याचे आपल्याला माहीतच असेल. पण आता सैफची मुलगी सारा आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
वरुण धवन आणि आलिया भट्ट या स्टार किडस्ना ज्याप्रमाणे स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून लॉन्च केले होते, त्याचप्रमाणे या दोघांनाही लॉन्च करण्याचा करणचा विचार आहे. एका वृत्तानुसार, करण जोहरच्या बॅनरखाली लवकरच दोघांना लॉन्च केले जाईल पण या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असणार याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.
