‘बाहुबली’ने तोडला बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड
निर्माता, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा चित्रपट ‘बाहुबली’ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडतोय. कारण दहा दिवसात बाहुबलीने 300 कोटींचा आकडा पार केला आहे, 10 दिवसांत एवढा आकडा पार करणारा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. बाहुबलीने याआधी सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘एंथिरन’चा रेकॉर्ड तोडला आहे. या चित्रपटाने 290 कोटी रूपयांची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाची कमाई 303 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली होती. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने आतापर्यंत 50 कोटी रूपयांची कमाई केली आहे. डब सिनेमाच्या बाबतीत ही देखील रेकॉर्ड तोड कमाई आहे.
शुक्रवारी सुपरस्टार सलमान खानचा सिनेमा बजरंगी भाईजान रिलीज झाला. हा सिनेमाही लोकांनी डोक्यावर घेतला असला, तरी बाहुबलीला याचा कोणताही फरक पडलेला नाही. दोन भावांमध्ये अधिकारांवरून झालेल्या संघर्षावर 250 कोटी रूपयांची ही बिग बजेट फिल्म आहे. या चित्रपटात प्रभाष, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाहुबलीचा पुढचा भाग असलेला चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज करण्यात येणार आहे.

