शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By वेबदुनिया|

बिग मनीचा फॉर्मेट आवडला : माधवानं

ND
ND
आर. माधवानं दक्षिण भारतातील लोकप्रिय कलाकार आहे. बॉलीवूडमध्ये पण त्याने आपली जागा बनवली आहे. ‘3 इडियट्स’ सारख्या सफल चित्रपटात प्रेक्षकांना त्याचे काम आवडले आणि आता तो टीव्ही वर ‘बिग मनी’ कार्यक्रमाचे संचलन करणार आहे, ज्याचे प्रसारण इमेजीन वर होणार आहे. माधवनशी घेतलेली मुलाखत :

हिंदी चित्रपटात सोलो हिरो म्हणून यश न मिळण्याचे काय कारण?
असे काहीच कारण माझ्या लक्षात येत नाही, मी कदाचित ऋत्विक रोशन आणि आमिर खान सारखा डांस किंवा फाइट सीन नाही करू शकत म्हणून मी स्टार नाही बनलो पण मी खूश आहे कारण मी आज जे काही आहे ते स्वत:च्या मेहनतीवर.

‘3 इडियट्स’च्या यशाचे तुला किती फायदा झाला?
आता जास्तीत जास्त लोक मला ओळखू लागले आहेत. मी स्वत: आपली लोकप्रियता पाहूण हैराण आहो. आता मला मिळणारे चित्रपटांची संख्येतसुद्धा वाढ झाली आहे.

‘बिग मनी’ शोच्या माध्यमाने तू परत एकदा टीव्ही समोर आला? हा शो करण्यामागे उद्देश्य काय आहे?
मी या शो चे निर्माते सिद्धार्थ बसुला पसंत करतो. त्यांच्या ‘क्विझ टाइम’ शो मला फार आवडायचा. त्याच बरोबर माझी शूटिंगची डेटस या शो सोबत मॅच झाली. माझे हिंदी चित्रपट ‘तनू वेडस मनू’ची शूटिंग पूर्ण झाली आहे आणि मी सध्या रिकामा आहे त्याचमुळे ह्या फॅमेली शो चे संचलन करण्यासाठी होकार दिला. यात पैसासुद्धा भरपूर मिळाला आणि जनते समोर टिकून राहण्याची संधीपण.

तुझा ‘डील या नो डील’ हा शो असफल राहिला होता. या शो च्या सफलतेसाठी तू किती आशान्वित आहे?
’डील या नो डील’ च्या शो मध्ये फारच अडचणी होत्या, पण ‘बिग मनी’ मध्ये असे नाही आहे. या निर्मातेचे सर्व काम व्यवस्थित आहे. या शोमध्ये विचारण्यात येणारे सर्व प्रश्न टीव्हीशी संबंधित आहे, सरळ आहे. म्हणून मला असे वाटते की हा शो जरूर सफल होईल.

जर तू या शोमध्ये एक प्रतियोगी म्हणून भाग घेतला असता तर किती पैसा कमावला असता?
टीव्ही कार्यक्रमाबद्दल जास्त ज्ञान नसल्यामुळे, जास्त पुढे नसतो जाऊ शकलो असतो.

टीव्ही आणि चित्रपटात काय अंतर आहे?
चित्रपट हिट झाले तर लोकं तुम्हाला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतात पण टीव्ही शो ची लोकप्रियता एका निश्चित काळ असतो.