मी रेसचा घोडा नाही- अक्षय कुमार
|
सुपरनॅचरल 'एट बाय टेन'
अक्षयचा 'एट बाय टेन' हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय. चित्रपट निर्माते आणि मल्टिप्लेक्स चालकांमध्ये सध्या वाद सुरू आहे. पण त्याचा फटका मात्र या चित्रपटला बसणार नाहीये. हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचा संप सुरू होणार आहे.
या चित्रपटाबाबत अक्षय आशावादी आहे. हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. पण अक्षयचा सुपरनॅचरल गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. फक्त तो स्वतः अभिनेता बनला ही गोष्ट मात्र सुपर नॅचरल असल्याचे तो हसत हसत सांगतो.
या चित्रपटाची पटकथा अक्षयला खूप आवडली होती. अक्षयने आतापर्यंत १२० चित्रपट केलेत. पण हा चित्रपट या सगळ्यात वेगळा होता. कारण यात एक्शन आणि कॉमेडी नाहीये. पण तरीही 'भुलभुलय्या' पेक्षा हा चित्रपट वेगळा ाहे, असंही तो स्पष्ट करतो. या चित्रपटाचे शीर्षक वेगळे वाटत असले तरी ते चित्रपटाला सूट करणारे असल्याचा त्याचा दावा आहे.
नागेश कुकनूरशी वाजलेले नाही
अक्षय व या चित्रपटाचा दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्यात 'वाजल्याची' चर्चा होती. पण अक्षय ती खोडून काढतो. नागेशची काम करण्याची पद्धत वेगळी आहे हे मात्र तो सांगतो. सुरवातीच्या काळात त्याला नागेशबरोबर काम करताना अडचण जाणवली. मात्र, नंतर तो सरावला. नागेशबरोबर काम करण्यास मजा आल्याचीही तो सांगतो. या चित्रपटासाठी अक्षयने कोणतीही विशेष तयारी केलेली नाही वा या विषयासंदर्भात कोणतीही पुस्तके वाचलेली नाहीत. दिग्दर्शकाने सांगितले ते मी केले असे तो सांगतो.
'एट बाय टेन'आणि 'चांदनी चौक...'
अक्षयचा चांदनी चौक टू चायना भरपूर प्रसिद्धी करूनही दणकून आपटला. त्यामुळे 'एट बाय टेन'ची चिंता आहे का असे विचारले असता अक्षयने असे काही नसल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट मी पाहिला आहे आणि मी संतुष्ट आहे. त्यामुळे तो हिट होईल, याची खात्री असल्याचे अक्षय म्हणाला.
आगामी काळ अक्षयचा...
या वर्षात अक्षयचे कम्बख्त इश्क, ब्लू बे सिनेमे येणार आहेत. हे सगळे बिग बजेट चित्रपट आहेत. निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठी आशा आहे. त्यामुळेच त्याच्यावर एवढे पैसे लावले गेले आहेत. या सगळ्यांचे दडपण येत नाही का? असे विचारले असता, मी माझे काम चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मेहनत घेत असतो. तेवढेच माझ्या हातात असल्याचे तो म्हणतो.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....
