1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

श्रद्धा शर्मासोबत एक भेट...

श्रद्धा शर्मासोबत एक भेट
WDWD

प्रश्न: श्रद्धा तुझ्याबद्दल थोडेसे सांग?
उत्तर: माझ्याबद्दल काय सांगू? माझे नाव श्रद्धा शर्मा असून मी जातीने ब्राम्हण आहे. माझे आई-वडील दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत‍. मी नुकतेच जयपूर येथे हिमेश रेशमिया आणि कुमार सानूबरोबर स्टेज शो केला आहे. काही दिवसांतच, सहारा वनच्या 'सुनो हर दिल कुछ कहता है' आणि स्टार प्लसवरील 'साथी' या मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. मला सूनेच्या भूमिकेत लोकांनी भरपूर प्रेम दिले असून अभिनयाशिवाय मला ड्रायव्हिंग, संगीत, नृत्यू, शॉपिंग आणि लोकांना भेटायला आवडते.

प्रश्न: सध्या शू‍टींग करत असलेल्या तुझ्या चित्रपटाबद्दल थोडेसे सांग?
उत्तर: सध्या मी एका संगीत चित्रपटाची शूटींग करत असून या चित्रपटात मी दुहेरी भूमिका करत आहे. त्यात एक साधी सरळ मुलगी आणि दुसरी मॉडर्न स्टायलिश मुलीची भूमिका करत आहे.

प्रश्न: जी. पी. सिप्पी फिल्म्सच्या आगामी चित्रपटाविषयी काही सांगशील का?
उत्तर: मी याविषयी काहीही सांगू शकत नाही. कारण या चित्रपटाची कथा सांगण्यास मनाई केल्यामुळे त्याविषयी अधिक बोलणार नाही.

प्रश्न: तू एटम गर्ल म्हणून चित्रपटसृष्‍टीत प्रसिद्ध होत आहे, याविषयी तुला काय वाटते?
उत्तर: कदाचित हो,.... कारण मला कमी कपडे घालण्यास आवडत असून यामध्ये मला काही चुकीचे वाटत नाही.

प्रश्न: म्हणजे तू चित्रपटात अंगप्रदर्शन करणे चुकीचे मानत नाही?
उत्तर: होय नाही. जर शार्ट स्कर्ट आणि मॉर्डन कपड्यात मी सुंदर दिसत असेल तर त्यात चुकीचे काय?

प्रश्न: आतापर्यंत तुझी कारकीर्द वादग्रस्त ठरली नसल्यामुळे तुला बिग बॉसमध्ये घेतले नाही?
उत्तर: हे पहा, बिग बॉस काय एखादी सौंदर्य स्पर्धा नाही. येथे केवळ वादग्रस्त ठरलेल्या लोकांनाच प्राधान्य दिले जाते.

प्रश्न: तू या कार्यक्रमात सहभाग घेणार होती. मग तुला माघार का घ्यावी लागली?
उत्तर: मला माहित नाही मला का दुर्लक्षित केले? 'बिग बॉस' माझा आवडता कार्यक्रम असून त्यातील लोक खूपच चांगले आहेत. पण त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य असल्याचे मला वाटते.

प्रश्न: तुझ्या अफेयरविषयी काही सांगू शकशील का?
उत्तर: (हसत) अजूनतरी मी एकटीच आहे. पण जो माझ्यावर मनापासून प्रेम करणार्‍याच्या मी नक्कीच शोधात आहे.

प्रश्‍न: मुबंईतील जिवन धावपळीचे असून विशेषत: मुली स्वत: ला असुरक्षितता समजतात. याविषयी तुला काय वाटते?
उत्तर: मला तर मुंबई शहर सुरक्षित असल्याचे वाटते. कारण मला आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागला नाही. अनेक वेळा मी एकटीच रात्री घराबाहेर पडते. पण मला काहीही वाईट अनुभव आला नाही.

प्रश्न: तू रात्री एकटीच फिरते का? कुणाला बरोबर....
उत्तर: नाही नाही, कोणीच नसते. मी येथे एकटीच राहत असून एकटीच फिरत असते. रात्री कधी झोप आली नाहीतर बाहेर फिरायला निघत असते.

प्रश्न: तुला डेटींगविषयी काय वाटते?
उत्तर: डेटींगवर जाणे मला चुकीचे वाटत नाही.

प्रश्न: तू पहिल्यांदा डेटींगवर कधी गेली होती?
उत्तर: जेव्हा मी पंधरा वर्षाची होते तेव्हा......

प्रश्न: आज तुला डेटींगवर जाण्याची संधी मिळाली तर तुला कोणाबरोबर जायला आवडेल?
उत्तर: मला टॉम क्रूझबरोबर डेटींगला जायला आवडेल. कारण, टॉम हँडसम असून तो मला खूप पसंत करतो.




























































































About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा