सोनू ने आळवले संस्कृत श्लोक
- किरण जोशी
|
गणेशोत्सव महाराष्ट्रात जोरात साजरा होत असला तरीही जगभरात गणपतीला तितकेच मानले जाते. म्हणूनच गणपतीवर आधारीत अनेक कॅसेट- सीडी बाजारात उपलब्ध आहेत. दररोज नवनिर्मिती होत आहे. पण, आपल्या पारंपरिक श्लोकांवर आधारीत काही नवीन स्वररचना, गीते रचून त्याला वेस्टर्न म्युझिकची साथ देण्याचा प्रयत्न महागणेशाच्या माध्यमातून प्रथमच झाला आहे.
संस्कृत श्लोक म्हणण्यास कठीण असले तरी सोनू् निगमच हे श्लोक म्हणू शकेल असा विश्वास कुर्हेकरांना होता. सोनूने विशेष मेहनत घेऊन रेकॉर्डिंग दिले. आणि एक चांगल्या अल्बमची निर्मिती झाली आहे. खुद्द सोनूलाही यातून बरेच काही शिकता आले आहे.
|
|
मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरात भावपूर्ण वातावरणात या अल्बमचे प्रकाशन झाले. यावेळी सोनू पत्नी व मुलासह उपस्थित होता. गणपतीविषयी आपली श्रध्दा व काही उत्कट भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.
