पुस्तक समीक्षा : 'द मूनशॉट गेम'

The Moonshot Game
Last Updated: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (16:00 IST)
गेल्या काही वर्षात आपल्या देशामध्ये 'स्टार्टअप' हा तरुणाईमध्ये परवलीचा शब्द बनलेला आहे. स्टार्टअप म्हणजे एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात. 'स्टार्टअप' संकल्पनेमध्ये असा व्यवसाय करणार्‍यापाशी स्वत:चे फारसे भांडवल नसलेतरी बिघड नाही. हवी असते ती कल्पकता, जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी. एखाद्या व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा 'व्हीसी'ला त्या स्टार्टपची क्लपना पसंत पडली आणि या बीजामध्ये वटवृक्ष होण्याची क्षमता आहे असा विश्वास वाटला, तर ते त्यात कोट्यावधींची गुंतवणूक करतात आणि त्या खतपाण्यावर असे स्टार्टअप मग वाढत वाढत गगनभरारी घेत जातात. स्टार्टअपचे रूपांतर काही काळातच अब्जावधींची उलाढाल करणार्‍या बड्या उद्योगामध्ये झाल्याची अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत. अशांची सुरुवात मित्रा-मित्रांनी एखाद्या छोट्याशा खोलीत सुरू केलेल्या एखाद्या स्टार्टअपमधूनच झालेली आहे.

आपल्या भारतात चाळीस हजारांहून अधिक स्टार्टप विविध क्षेत्रांत आणि प्रगतीच्या विविध टप्प्यांवर कार्यरत आहेत आणि 130 अब्ज डॉलरची त्यांची एकूण उलाढल आहे. अर्थात, हे सगळे विश्व काही एका दिवसात उभे राहिलेले नाही. भारतीय स्टार्टअप्सच्या या प्रवासामध्ये अनेक चढउतार आहेत, 'व्हीसीं'चे पाठबळ आहे, त्या 'व्हीसीं'च्या मागे उभ्या असलेल्या देशी-विदेशी 'एंजल इन्व्हेस्टर्स'चा सकारात्मक दृष्टीकोन आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वप्ने पाहणार्‍या भारतीय तरुणाईचे परिश्रम आहेत.

भारतातील स्टार्टअपच्या या क्रांतीमध्ये व्हेंचर कॅपिटलिस्टचे योगदान नेमके कसे असते, ते सुयोग्य स्टार्टअपची निवड कशी करतात, त्यांना पाठबळ कसे देतात हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी नुकतेच प्रकाशित झालेले राहुल चंद्रा यांचे 'द मूनशॉट गेम' हे पुस्तक आपण वाचायलाच हवे. 'मूनशॉट' चा अर्थच मुळी आहे की अपयशाची अधिक शक्यता असलेली एखादी दीर्घकालीन गुंतवणूक वा प्रकल्प, परंतु त्यातून घडून येणारे संभाव्य परिणाम मात्र प्रचंड असतात! भारतामध्ये स्टार्टअपचे युग सुरू झाले आहे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये. अमेरिकेतील डॉट कॉम युगाच्या उदयासरशी तेथील आयटी कंपन्यांनी भारतामध्ये आऊटसोर्सिंग सुरू केले आणि विदेशातील कंपन्यांसाठी भारतातून काम करणार्‍या कंपन्यांच्या मदतीला हे विदेशी व्हेंचर कॅपिटलिस्ट भारताकडे वळले, परंतु ही लाट काही फार काळ टिकली नाही. अमेरिकेतील डॉट कॉम युगाचा फुगा लवकरच फुटला त्यासरशी ही लाटही विरून गेली. अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या किंवा खुल्या बाजारातून भांडवल उभे करून त्यांनी तग धरली. इंडया डॉट कॉम, ईगुरुकुल, जॉब्सअहेड वगैरे तेव्हाचे असे प्रयत्न आठवा. ती अशा प्रयत्नांची सुरुवात होती असे दिसेल.
पुन्हा दुसरी लाट आली ती साधारण 2006 च्या सुमारास. अमेरिकेतील व्हेंचर कॅपिटलिस्टांची नजर भारताकडे वळली. येतील योग्य स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी येथे माणसे तैनात केली. त्यातून अनेक स्टार्टअप कंपन्या जोमाने उभ्या राहिल्या. बघता बघता वाढत गेल्या. आज आपल्या अवतीभवती त्या दिसतात. मेकमायट्रीप असो, फ्लीपकार्ट असो, स्विगी वा झोमॅटो असो, क्षेत्रे वेगवेगळी असली तरीही ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे एकेकाळी निव्वळ स्टार्टअपच होते. त्यांना योग्य वेळी योग्य प्रकारे भांडवल मिळाले म्हणून त्या पुढे येऊ शकल्या. स्पर्धात्मक युगामध्ये टिकाव धरू शकल्या. हे सगळे कसे घडले त्याची कथा या पुस्तकामध्ये राहुल चंद्रा आपल्याला सांगतात. राहुल हे भारतात आलेल्या वॉल्डन इंटरनॅशनल या पहिल्या‍वहिल्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनीचे येथील पहिले अधिकारी. पुढे हेलियन व्हेंचर्सचे सहसंस्थापक आणि शेवटी स्वत:च्या युनिटरी हेलियनद्वारे त्यांनी अनेक होतकरू तरुणांच्या स्टार्टअपमध्ये प्राण फुंकले. त्याच सार्‍या प्रवासाची ही मनोज्ञ कहाणी आहे. वॉल्डन इंटरनॅशनलचा भारतातील पहिला ग्राहक होता रॉनी स्क्रूवाला, ज्याने भारतीय टेलीव्हीजनवर टेलीशॉपिंगची सुरुवात आपल्या टेलिशॉपिंग नेटवर्क (टीएसएन) द्वारे केली होती. त्यावर विकल्या जाणार्‍या 'रोटी मेकर'ला तेव्हा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. व्हीसीच्या सहसा बाहेरच्या जगाला अज्ञात असणार्‍या विश्वाची ओळख हे पुस्तक घडवते. त्यातील यशापयशाची प्रांजळ चर्चा करते. त्याच बरोबर भारतीय स्टार्टअप्सच्या प्रवासाचीही ही कहाणी आहे.
मेक माय ट्रीप पासून बुक माय शो पर्यंत, फर्स्ट क्रायपासून टॅक्सी फॉर शुअरपर्यंत असंख्य स्टार्टअप्सच्या उभारणीमध्ये राहुल यांनी व्हीसी या नात्याने योगदान दिले. त्यात आलेल्या अडचणी, उभी राहिलेली आव्हाने हे सगळे या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते.

उदाहरण द्यायचे झाले तर मेक माय ट्रीपचे देण्यासारखे आहे. दीप कालरा या तरुणाने 2000 साली ही स्टार्टअप सुरू केली. सुरवातीला विमान प्रवासाची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध करायची ही त्यामागील कल्पना होती. तो काळ लक्षात घ्या. ट्रॅव्हल एजंटमार्फतच अशी तिकिटे आरक्षित केली जात असत. अशा काळी एक नवे ऑनलाइन मार्केट उभे करण्याचा प्रयत्न मेक माय ट्रीपने केला. सुरवातीला हा प्रयोग फसला देखील, परंतु त्यातून तावून सुलाखून मेक माय ट्रीप उभी राहिली आणि तिने मागे वळून पाहिलेच नाही. अब्जावधी डॉलरची तिची आजची उलाढाल आहे.
बुक माय शोचीही अशीच कथा. चित्रपटागृहातील तिकिटे ऑनलाइन विकणे ही यामागील संकल्पना. न्यूझीलंडमधील कंपनीकडून एक सॉफ्टवेअर विकसित करून घेऊन थिएटर मालकाकडून विकल्या जाणार्‍या प्रत्येक तिकिटामागे दहा रुपये कमिशन घेऊन बुकमायशोने हा प्रयोग सुरू केला. हळूहळू प्रेक्षकांना तशी सवय लावून एक नवी ऑनलाइन बाजारपेठ बुकमायशोने उभी केली आणि गगनझेप घेतली. विशेष म्हणजे बुकमायशोमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव जेव्हा राहुल यांच्या व्हीसीकडे आला होता, तेव्हा त्यांनी प्रति तिकीट दहा रुपये या उत्पन्नाचे गणित करून भांडवल पुरवण्यास नकार दिला होता. भारतीय चित्रपटरसिकांची संख्या त्यावेळी त्यांनी विचारात घेतली नाही. त्यामुळे पुढे बुकमायशोची संकल्पना जेव्हा कमालीची यशस्वी झाली तेव्हा आपल्याकडून त्यांना आजमावण्यात चूक झाल्याची कबुलीही राहुल यांनी पुस्तकात दिली आहे.
अशा अनेक स्टार्टअपच्या जडणघडणीतील व्हीसी या नात्याने दिलेल्या योगदानाची, त्या बर्‍या वाईट अनुभवांची विस्तृत चर्चा या पुस्तकामध्ये आपल्याला खिळवून ठेवते. व्यवसायातील अनिश्चितता स्टार्टअप्सच्या बाबतीतही असतेच. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशात सुळसुळात झालेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर जेव्हा काही कर्जबारी लोकांनी केलेल्या आत्महत्यांमुळे तेथील सरकारने बंदी घातली आणि नेत्यांनी कर्जदारांना कर्ज परत न फेडण्यास सांगितले, त्या प्रसंगाची आठवण चंद्रा यांनी नमूद केली आहे.
भारतातील अनेक स्टार्टअप ही अमेरिका किंवा चीनमधील यशस्वी स्टार्टअपची नक्कल असते अशी खंतही ते व्यक्त करतात. मात्र, आजकाल स्टार्टअप्सही वाढत आहेत. त्यांच्यासाठी सरकार इनक्युबेटर उभारते आहे. प्रोत्साहन देते आहे, व्हीसींची ताकदही वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणावर ते भांडवल पुरवू शकतात. त्याच बरोबर डेटा सायन्स विकसित झालेले असल्याने ग्राहकांची आवडनिवड, सवयी या सार्‍याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून निर्णय घेणे व्हीसींसाठीही सोपे बनल्याचे ते सांगतात. स्टार्टअपच्या आगळ्यावेगळ्या विश्वाची आणि त्याहूनही व्हेंचर कॅपिटलिस्टच्या वेगळ्या जगाची ओळख घडवणारे हे पुस्तक होतकरू स्वप्नदर्शी तरुणाईने नक्कीच वाचायला हवे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

विक्सचे गुण, वेदनासह त्वचेवरील डाग देखील घालवण्यात फायदेशीर

विक्सचे गुण, वेदनासह त्वचेवरील डाग देखील घालवण्यात फायदेशीर
सर्दी पडसं हे हंगामात बदल झाले की होणारच. सर्दी झाल्यावर आपले नाक बंद होत, श्वास घेण्यास ...

उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस

उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस
सर्वप्रथम एका भांड्यात किसलेलं नारळ घाला त्यामध्ये शेंगदाण्याच कूट घाला. या मध्ये ...

दूरसंचार विभागात इंटर्नशिपची संधी

दूरसंचार विभागात इंटर्नशिपची संधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे दूरसंचार विभागात संचार मंत्रालयानं भारत ...

मत्स्यासन योगाने श्वासाचे आजार आणि पोटाचे आजार दूर होतात

मत्स्यासन योगाने श्वासाचे आजार आणि पोटाचे आजार दूर होतात
दररोज आपल्याला योग केले पाहिजे. योगाच्या माध्यमाने आपल्या शरीरातील सर्व विकारांवर मात ...

Cycling करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा आरोग्यास ...

Cycling करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा आरोग्यास हानी होऊ शकते
सध्याच्या कोरोनाच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बहुतेक लोक सायकल चालविणे पसंत ...