Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपोत्सवातून काव्यप्रेरणा..

Updated: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:36 IST)
‘उन्मनीच्या सुखाआंत | पांडुरंगी भेटी देत ||
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी | जागृती स्वप्नी पांडुरंग ||’

ही अवस्था कवी मनाची कशी होते याचा भाव व्यक्त करण्यास कवी शब्दांची जुळवा-जुळाव करतांना भावविवश कसा होतो वाचकांच्या मनाचा ठाव कसा घेतो हे वाचनीय ठरते. ग्रामीण शब्दरचना वाचकांना अधिक जवळकीची वाटावी, सहज मनात रेंगाळावी, काव्यातील माधुर्य आणि गेयता चिरस्मृतीत रहाव्या अशा, तर काही कविता भ्रष्टाचार, राजकारण, फसवणूक या बरोबरच निसर्गकोप, दुष्काळ, हवालदिल शेतकरी, असहाय्य सामान्य नागरिक तर कधी जाज्वल्य देशभक्ती, समर्पणाची भावना व्यक्त करणा-या तर कधी आपले सगेसोयरे, हेवे-दावे तर कधी जन्मादात्यांचे उपकार, त्यांच्या बद्दलचा आदर, कर्तव्यभावना अनेक कवितांमधून डोकावतांना दिसतात.    

माणसास होणा-या व्याधी, मानसिकता, भ्रुणहत्या इत्यादी विषय काव्य लेखनात पोटतिडकीने शब्दरूप देणारा कवी निदर्शनास येतो. स्तुत्य आणि अभिनंदनीय असा हा दिवा दीपोत्सव म्हणजे नवकवी, अभिजात कवी, व्यासंगी कवी यांना प्रेरणा देणारा, प्रोत्साहित करणारा असून हे एक नवे विचारपीठ निर्माण करून देणारा दिवाळी अंक आहे. ओजस्वी आणि भावपूर्ण काव्याची निर्मिती व्हावी, नवकवींच्या लिखाणास संधी मिळावी, मानसन्मान व्हावा, त्यांच्या काव्याचे मुल्यांकन होऊन त्यांना न्याय मिळावा या उदात्त भावनेने ‘कवितासागर’ ने उचललेले हे पाऊल नक्कीच यशदायी, फलदायी ठरणार यात शंकाच नाही. दिवा दिपोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेता यावा म्हणून ही सगळी पराकाष्टा...कवितेच्या वाटेवरील पांथस्तांना दिलेली ही अनमोल भेट ठरावी. काव्य लेखनाची ही सर्वांगीण समीक्षा काव्य रसिकांना विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उदबोधक ठरेल ही अंत:करणापासून शुभेच्छा.

शब्द शोधी शब्द जाणी शब्दसंगे चाल भाई |
शब्द आकाश शब्द पाताळ शब्द पिंडी ब्रम्हांडी राही ||

शब्द वाणी शब्द कानी शब्द मूर्ती विचार चिंतनी |
शब्द वेड शब्द नाद शब्द शास्त्र नीट गात राही ||

शब्द यंत्र शब्द मंत्र शब्दही गुरुपदेश गाई |
शब्द तत्त्व शब्द संसार शब्द आकार निराकार राही ||

शब्द पुरुष शब्द नारी शब्द ब्रम्हा विष्णू महेश राही |
शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रम्ही या निनादात राही ||

शब्द शब्दा पारखून घेई सांगे कबीर शब्दही भगवंत भाई...

                                                         - वाचक संवाद

प्रत्येकाने आयुष्यात कळत न कळत एखादी तरी कविता केलेली असते. जी न कळत होते तीच तर खरी कविता असते म्हणूनच साहित्य ही जीवनाची एवढी साधी, सोपी, सरळ आणि भावसुंदर अभिव्यक्‍ती असते. साहित्य हे ज्ञान व दिशा देण्याचे काम करते. अलीकडच्या काळात मोबाईल आणि संगणकामुळे मुले साहित्य व नीतिमत्तेपासून दूर जात आहेत.

कविता ही मुलभूत व खोलवर परिणाम करणारी व त्यामुळेच सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार मानला जातो. इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा कविता ही अधिक स्पंदनशील असते. ती प्रामाणिकपणे लिहिणा-या प्रतिभावंतालाच वश होते. मनात आलेले भाव सहजपणे शब्दात गुंफून कविता लिहिल्या जातात आणि अशाच कविता चिंतनपर होतात. रोजच्या जगण्यात मानव, निसर्ग, समाज आणि मानवाचा मानवाशीच चाललेला संघर्ष ह्यामुळे व्यथीत झालेले व्यक्तित्व आणि त्याचा स्वतःच्या जीवनाशी असलेला संबंध शोधणे आणि या सर्व भावनिक वादळांना झेलून कवितेत प्रसन्नता आणणे हे काम ही कविताच करते. जगण्याचा संदर्भ न हरवता जगण्यावर प्रेम करणे हेच दिवा दीपोत्सवच्या निर्मितीचे सूत्र आहे.  

सर्व कवी बंधू - भगिनींना काव्यलेखनात अधिक यश लाभो व त्यांचे हातून कसदार काव्य निर्माण होवो आणि जन - सामान्यांच्या हृदयात आदर - सन्मानाचे भाव अढळ राहो ही सद् भावना...

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

कॉलेज संपताच चांगली नोकरी हवी? आजपासून सुरू करा या 5 सवयी

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

पुढील लेख
Show comments