मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (20:20 IST)

Career Tips : चांगले करिअर करायचे असल्यास नियोजन करणे आवश्यक आहे, या 7 टिप्स फॉलो करा

career
प्रत्येक जण यश मिळविण्यासाठी धडपड करत असतात. यासाठी लोक लाखो रुपये खर्च करून देश-विदेशातील चांगल्या कॉलेजमधून शिक्षण घेतात, परंतु त्यानंतरही चुकीच्या करिअर नियोजनामुळे त्यांचे ध्येय साध्य होत नाही. सक्षम करिअर नियोजन ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या करिअरच्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग तयार करतात.
 
करिअर प्लॅनिंग म्हणजे काय?
शिक्षणानंतर लोक संस्था, कंपनी आणि त्यांनी निवडलेल्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करतात. करिअर नियोजन हा संस्थेतील पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन चा (Personal Administration) एक भाग आहे ज्याचे उद्दीष्ट असे मार्ग विकसित करणे आहे जेथे कर्मचारी संस्थेमध्ये कालांतराने प्रगती करू शकतात. कोणत्याही कंपनीतील करिअरचा मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी तयार केलेला नसतो, तर नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या गरजा, क्षमता, आवडी इत्यादींच्या आधारे स्वत:चा मार्ग बनवावा लागतो. गेल्या काही वर्षात जॉब मार्केट खूप बदलले आहे.
 
नोकरीची सुरक्षा, दरवर्षी पदोन्नती आणि वेतनवाढ ही आता भूतकाळातील गोष्ट आहे. अर्थव्यवस्थेच्या कमकुवतपणाच्या काळात, नोकरीच्या बाजारपेठेतील अनिश्चितता देखील एक अपरिहार्य परिस्थिती बनली आहे. म्हणूनच करिअरचे चांगले नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे.
 
अशा प्रकारे करा करिअर प्लॅनिंग
1. आधी स्वतःला समजून घ्या-
करिअर प्लॅनिंग करण्यापूर्वी स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि तुम्हाला करायच्या असलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार करा. त्यानंतर, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्यांची यादी बनवा. अशा प्रकारे, स्वत: ला समजून घेऊन, आपण सहजपणे आपला कल कशा कडे आहे ह्याचा अंदाज लावू शकता.
 
2. सध्याच्या जॉब प्रोफाइलचे मूल्यांकन करा-
यानंतर तुम्हाला तुमचे करिअरचे ध्येय निश्चित करावे लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या जॉब प्रोफाइलचे मूल्यांकन करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या वित्तीय नियोजकाकडे जाता तेव्हा त्याला प्रथम तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल जाणून घ्यायचे असते. त्यावर, तुमची वर्तमान भूमिका आणि भविष्याचा विचार करा. तुमची कंपनी त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पुनरावलोकन करत असेल, तुम्ही स्वतःसाठीच्या आव्हानांचा लवकरच आढावा घ्यावा.
 
3. दीर्घकालीन करिअर योजनेवर लक्ष केंद्रित करा-
तुम्ही ज्या संस्थेत काम करत आहात, त्या संस्थेत पुढच्या 4-5 वर्षांत तुम्हाला लीडरच्या भूमिकेत यायचे असेल, तर त्यावर लक्ष केंद्रित करा. एकदा उद्दिष्ट निवडले की ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक कौशल्ये ओळखा. सध्या त्या पदावर असलेल्या व्यक्तीचे कौशल्य काय आहे  हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यातील काही कौशल्य तुम्ही शिकले पाहिजे. दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही एकाधिक फंक्शन्समध्ये कार्य करण्यास सक्षम असले पाहिजे. दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तुम्हाला छोटी उद्दिष्टे पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
4. शिका आणि कौशल्ये वाढवा-
कोरोना नंतर जॉब मार्केट ज्या प्रकारे अस्थिर आहे आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती सतत बदलत आहे, नवीन कौशल्ये शिकणे हा करिअर नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. करिअरमध्ये तुम्हाला आयुष्यभर काही ना काही शिकायचे असते. ऑनलाइन शिक्षणाच्या मदतीने  हे काम अगदी सहज करू शकता. जर तुम्ही तुमच्या कामानुसार आधुनिक कौशल्ये शिकण्यासाठी आठवड्यातून 5-6 तास काढू शकत असाल, तर तुम्ही तुमची नोकरी गमावण्याचा धोका अगदी सहज सोडू शकता. नवीन गोष्टी सहज शिकण्याची तुमची क्षमता तुम्हाला नोकरीच्या बाजारपेठेत टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
 
5. शिकलेल्या कौशल्यांचा वापर करा-
जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकता तेव्हा त्या वापरण्याच्या संधी शोधा. तुमच्या संस्थेच्या भविष्यातील प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची शक्यता तपासा आणि त्यात तुमची कौशल्ये वापरा. उदाहरणार्थ, आजच्या काळात प्रत्येक कंपनी डिजिटल अडथळ्याशी झुंज देत आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी संघ तयार करत आहे. यासारख्या प्रोजेक्टवर काम करणे खूप महत्त्वाचे असू शकते कारण कंपनी तुम्हाला सर्व शक्य मदत पुरवते.
 
6. दिशा घ्या-
तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात, तिथे तुमची कार्यक्षमता वाढवण्यात तुमच्या लीडर ची महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्ही लीडरच्या संपर्कात असाल, ज्या स्थानापर्यंत पोहोचायचे आहे, त्याच्यासोबत प्रशिक्षण घेणे चांगले. त्याचे वय, अनुभव इत्यादींचा प्रभाव पडू देऊ नका. तुमच्या टीममधील सर्वात लहान सदस्य देखील नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी सर्वोत्तम शिक्षक असू शकतो. जर तुमची संस्था मॉनिटरिंगसाठी संधी देत ​​असेल तर हा सर्वोत्तम पर्याय असेल.
 
7. लोकांशी संपर्क साधण्यास शिका
तुमचे नोकरीचे क्षेत्र कोणतेही असो, लोकांशी जुडले जाणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमचे संबंध मजबूत करत राहा. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवा आणि अशा लोकांपर्यंत पोहोचा जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतात. तसेच तुमच्या शाळा-कॉलेजचे जुने नेटवर्क चांगल्या स्थितीत ठेवा. कारण असं म्हणतात कधी कोण केव्हा कामास येईल असे सांगता येत नाही. त्यामुळे लोकांशी संबंध टिकवून ठेवा. या मुळे तुम्हाला करिअर मध्ये पुढे वाढण्यास मदत मिळेल.