शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (21:12 IST)

Career Tips : बारावीनंतर फूड सायन्स क्षेत्रात करा करिअर, पात्रता , पगार, व्याप्ती जाणून घ्या

आजच्या बदलत्या जीवनशैली आणि चुकीचे आहार सेवन केल्यामुळे आरोग्याशी निगडित लठ्ठपणा, बीपी आणि हृदयाशी संबंधित आजार उदभवतात.अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. हळुहळू लोक त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक होत आहेत आणि निरोगी जीवनशैली आणि आहाराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजच्या काळात उदयोन्मुख क्षेत्र आहे. बारावी नंतर काय करावे हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. अनेक विद्यार्थी बारावीनंतर या क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत.
 
अन्न विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, अन्न उत्पादनांच्या रसायनशास्त्र आणि जैवरसायनशास्त्राविषयी ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रात, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेव्यतिरिक्त, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि पोषक तत्वांबद्दल देखील त्यांना चांगले ज्ञान असले पाहिजे.
 
पात्रता
जर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि गृहविज्ञान या विषयांसह 12वी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. बॅचलर डिग्री केल्यानंतर, तुम्ही फूड केमिस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि इतर क्षेत्रात प्रगत पदवी देखील करू शकता. याशिवाय तुम्ही आहारशास्त्र आणि पोषण आणि फूड सायन्स आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये डिप्लोमा देखील करू शकता. 
 
अभ्यासक्रम -
तुम्ही अखिल भारतीय संयुक्त प्रवेश परीक्षेद्वारे (AIJEE) फूड टेक्नॉलॉजी आणि बायो-केमिकल सायन्समधील सरकारी महाविद्यालयांमधून बी.टेक पदवी करू शकता. जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स्ड उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही आयआयटीमधून फूड टेक्नॉलॉजीचा अभ्यास करू शकता. गेट फूड टेक्नॉलॉजी प्रवेश परीक्षेद्वारे तुम्ही आयआयएससी बंगलोरमध्ये प्रवेश मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही कोणत्याही खाजगी संस्थेतून फूड टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन देखील करू शकता. 
 
संधी 
 
फूड सायन्समध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खालील पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते - 
 
* फूड प्रोडक्शन मॅनेजर 
 
* फूड टेक्नोलॉजिस्ट
 
* क्वालिटी मॅनेजर 
 
* न्यूट्रीशनल अँड सप्लिमेंट थेरपिस्ट 
 
* प्रोसेस डेव्हलमेंट सायन्टिस्ट
 
* प्रोडक्ट रिसर्चर 
 
* फूड परचेजिंग मॅनेजर 
 
* रेग्युलेटरी अफेअर ऑफिसर 
 
* लॅबोरेटरी टेक्निशियन 
 
*फूड रिसर्चर सायन्टिस्ट 
 
पगार-
आज अन्न विज्ञान हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. फूड सायन्समधील पदवी पूर्ण केल्यानंतर, तुमच्यासाठी FMCG, फार्मा, अॅग्रो, डेअरी, बेकरी, फूड पॅकेजिंग यासह अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो. तर, पाच वर्षांपर्यंतचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, तुमचा पगार वार्षिक 5 ते 6.4 लाख रुपये होऊ शकतो. जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसा पगार देखील वर्षाला 9 ते 18 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.