शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (16:11 IST)

ऑनलाईन काम करा आणि घरी बसूनच पैसे कमवा, कसे काय जाणून घ्या

कोरोनाच्या या काळात सर्वत्र नोकरीच्या क्षेत्रात अवघडच दिसत आहे. बरेच लोकं आपल्या नोकऱ्या गमावून बसले आहेत. जर का आपण देखील या अश्या अवघड  परिस्थितीमधून निघत आहात तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण घरात बसून सुद्धा पैसे कमावू शकता. चला जाणून घेऊया पैसे कमावायचा काही अश्या सोप्या पद्धती.
 
वर्क फ्रॉम होम संकल्पना -
आजच्या काळात महिलांनी स्वतंत्र असणं फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी घराच्या बाहेर पडूनच नोकरी करावी असे काही आवश्यक नाही. त्या ऑनलाईन काम करून देखील पैसे कमावू शकतात. कोरोनाच्या या काळात सर्वच अवघड झाले आहे त्यामुळे त्यांना घरातूनच पैसे कमावणे आता शक्य आहे. वास्तविक तर या काळात बऱ्याच कंपन्यांनी घरातून काम करण्याची संकल्पना राबविली आहे. त्यामुळे लोकं घरातूनच काम करीत आहे. फ्री -लॉन्सर किंवा पार्टटाइम काम करणाऱ्यांसाठी या वेळी अनेक ऑनलाईन कमाईचे पर्याय आहेत. आपण देखील याचा प्रयत्न करू शकता. 
 
ऑनलाईन कोचिंग क्लासेस - 
कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी सर्वच शाळा सध्या बंद आहेत, कोचिंग क्लासेस देखील बंद आहेत. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणच सुरू आहेत. आपण जर का एखाद्या विषयाचे शिक्षण देत असाल तर आपण ऑनलाईन कोचिंग देखील सुरू करू शकता. अश्या बऱ्याचशा वेबसाइट आणि प्लॅटफॉर्म आपल्याला ऑनलाईन सापडतील, जिथे आपण नोंदणी करून ऑनलाईन कोचिंग देऊ शकता.  
 
कंटेंट राइटिंग- ब्लॉग राइटिंग -
कोरोना काळात लोकांची ऑनलाईन वाचन करण्याचा आणि व्हिडिओ बघण्याच्या सवयींमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे चांगल्या कंटेंट (साहित्याची) गरज देखील वाढत आहे. बऱ्याच ऑनलाईन मासिक, ब्लॉग साईट्स आणि बऱ्याचशा प्लॅटफॉर्मला नव्या रुचिपूर्ण साहित्याची गरज असते. जर आपल्याला चांगले साहित्य लिहिण्याची आवड असल्यास आणि आपल्याला ते लिहिता येत असल्यास ऑनलाईन राइटिंग करून चांगले कमावू शकता. 
 
ऑनलाईन सेल्स - 
आपल्या सामाजिक ओळखी चांगल्या आहेत आणि आपल्या शब्दांना लोक पाळतात, तर आपल्यासाठी हा व्यवसाय योग्य आहे. आपण आपल्या या कौशल्याचा वापर या व्यवसायासाठी करू शकता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट सह संलग्न होऊन आपण त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा उत्पादनांना आपल्या ओळखीतल्या लोकांना सांगा. त्यांनी ते उत्पाद खरेदी केल्यावर आपल्याला देखील कमिशन मिळेल. अश्या प्रकारे पैसे मिळविण्यासाठी आपल्याला त्या वेबसाइटच फॉर्म भरावा लागणार, आणि त्या वेबसाइट्स मध्ये सामील व्हावे लागणार.
 
यू ट्यूब चॅनल व इतर सोशल साईट्स - 
आपल्याकडे अशी काही खास कौशल्ये असतील जी आपल्याला जगाला दर्शवायची किंवा शिकवायची असल्यास आपण यू ट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम पेज चा वापर करू शकता. या प्लॅटफॉर्म वर आपल्या फॉलोवर्स, किंवा आपली लोकप्रियता वाढल्यावर आपल्या पैसे मिळतील. हे पैसे आपल्याला आपल्या पेज किंवा चॅनल वर मिळणाऱ्या जाहिरातींमार्फत मिळतील. जर का आपल्या पेजला लहान -मोठे ब्रँड प्रायोजक असल्यावर आपल्याला त्यापासून कमावता येईल.