शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (17:41 IST)

राज्यात MPSC च्या जागांची भरती होणार, डिसेंबरमध्ये सैन्यभरती

राज्यात MPSC पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती होणार आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 
 
राज्यातील MPSC रिक्त पदे भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश देताना या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील अशी माहितीही पवार यांनी दिली.
 
तसेच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सैन्यभरती होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोल्हापूर मध्ये डिसेंबरमध्ये सैन्यभरती होणार असून त्या भरती संबंधीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.