आपल्याला करिअरमध्ये यशाची पायरी चढायची असेल तर नक्की वाचा

Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (10:11 IST)
प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये वाढ हवी असते. काही कमतरता असतात जे आपल्याला पुढे वाढू देत नाही. त्या आपल्याला पुढे वाढण्यापासून प्रतिबंधित करतात. आज आम्ही आपल्याला अशा काही कामाचा टिप्स सांगत आहोत जे आपल्याला करिअरमध्ये वाढण्यास मदत करतील.

जगात असे कोणी नसेल ज्याला बढती नको असेल. करिअरच्या प्रवासात प्रत्येक वळणावर योग्य मार्गाने योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टीकोनासह वाढविल्यानेच यश गाठता येतं. हा प्रवास वर्षानुवर्षे सतत चालू असतो. त्या नंतर कुठे जाऊन आपण आपल्या करिअरच्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचता, जिथून मागे वळून बघितल्यावर आपला आनंद आणि समाधान वाटतं.

या वेळी आपणास दर वर्षी प्रत्येक क्षणाला हे प्रामाणिकपणे मूल्याकंन करावे लागणार की कुठे उणी राहिली. स्वतःशी सत्याने वागावे लागणार. कारण आपल्याला आपल्यापेक्षा इतर कोणीही चांगले सांगू शकणार नाही. म्हणून आपण त्या उणींना दूर करून नवीन संकल्प घेऊन यशाची उंच भरारी घ्या. इथे दिले जाणारे काही महत्त्वाचे टिप्स आपल्याला करिअर सुधारण्यात मदत करतील.

* संप्रेषणाची पद्धत शिकणे आणि अमलात आणणे -
आपली कंपनी चांगली कामगिरी करून त्याचा विस्तार करते. कंपनीचा हा विस्तार जागतिक स्तरावर असतो. अशा परिस्थितीत, आपल्याला आपल्या संप्रेषणाची पातळी सुधारावी लागते. अशा परिस्थितीत आपले आउटपुट आपण समोरच्याशी कशा प्रकारे संप्रेषण ठेवता या वर देखील निर्भर असते. बऱ्याचवेळा आपल्याला ईमेलची सवय लावून घ्यावी लागते. आणि त्या सर्व नवीन गोष्टींना आपल्या जीवन शैलीचा भाग बनवावा लागतो जे कम्युनिकेशन किंवा संप्रेषणचा भाग बनत आहेत. या शिवाय फोन वर प्रभावी संवाद करण्याच्या पद्धती शिकणे देखील आवश्यक असतं. आपल्याला वाटते की आपण आपल्या करिअर आणि व्यक्तिमत्त्वात काही कमतरता अनुभव आहात, तर आपण नव्याने सम्प्रेशन किंवा संवाद सुधारण्यासाठी पुढाकार घेऊ शकता.

* नवीन कौशल्ये अपडेट करा -
आजच्या काळात कामाच्या ठिकाणी नवीन कौशल्याची मागणी वाढतच आहे. त्यांना कामाच्या स्वरूपात अधिक महत्त्व दिले जाते. जे लोक आपल्या नोकरीच्या प्रोफाइलपासून लांब जाऊन नवे कौशल्ये विकसित करतात. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण नव्या कौशल्याने पुढे वाटचाल करू शकता. या मुळे आपल्या कारकिर्दीने सगळी कडे आपले वर्चस्व वाढते आणि लोक आपले कौतुक देखील करतात. अशा बऱ्याच कंपन्या आहेत जे आपल्या कर्मचाऱ्यांमधील कौशल्ये वाढविण्यासाठी सुविधा देत आहेत. अशा संधीचा फायदा आपण नक्की घ्यावा.

* जोखीम घेणं पत्करा -
जेव्हा एखादी कंपनी मोठी गुंतवणूक करते, तेव्हा त्या शोधात असतात अशा लोकांच्या जी त्यांचा हेतूंना यशस्वी करतील. अशा परिस्थितीत आपली जवाबदारी आहे की आपण पुढे वाढून शक्य तितके काम करण्याचा प्रयत्न करावे. जर आपल्या कंपनीमध्ये असे व्यासपीठ आपल्याला मिळाले नसेल तर आपण स्वतः पुढाकार घेऊन करावे लागणार. आपण फ्रीलान्सर असल्यास किंवा आपण व्यावसायिक असाल तरी देखील ही सवय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जोखीम घेऊन जेव्हा आपण यशस्वी होऊ लागता, तेव्हा हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतो.

* कार्यालयाच्या बाहेर आपले नेटवर्क बळकट करा -
सध्या रेफरल संस्कृती हायरिंगचा एक भाग बनली आहेत. कंपन्या रेफरल उमेदवार हायर करण्यात रस दाखवितात. या द्वारे त्यांना कमी श्रम करता चांगले उमेदवार मिळतात आणि त्यांची हायरींग प्रोसेस किंवा नियुक्ती प्रक्रिया सोपी होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या पूर्वीच्या सहकारी किंवा मित्रांच्या संपर्कात असल्यास, आपल्याला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात. असो, कार्यालयाच्या बाहेर लोकांना भेटणं किंवा त्यांचा सह वेळ घालवणं चांगली सवय आहे. म्हणून नव्या वर्षात ही आपले संकल्प होऊ शकतं.

* तंत्रज्ञानात प्रभुत्त्व मिळवणं -
कामाच्या ठिकाणी आपली उत्पादकता वाढविण्यासाठी कंपन्या स्मार्टफोन आणि नवीन अ‍ॅप्स वापरत आहेत अशा परिस्थितीत
तंत्रज्ञानाच्या बदलानुसार स्वतःला अपडेट ठेवणं आवश्यक झाले आहेत. जर आपण एक टेक्नो वर्कर असाल तरी आपल्याला आपल्या अवतीभवती होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवणं त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. आपण तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवल्यावर आपण आपल्या कामात बदल घडवून आणू शकता आणि बढती मिळवू शकता.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

चमकणाऱ्या त्वचे साठी नवीन होणाऱ्या आईने या 6 सोप्या टिप्स ...

चमकणाऱ्या त्वचे साठी नवीन होणाऱ्या आईने या 6 सोप्या टिप्स अवलंबवा
प्रसूतीनंतर बायकांच्या शरीरात बरेच बदल होतात. या मुले त्यांच्या त्वचेवर देखील बरेच बदल ...

अस्वल आणि दोन मित्र

अस्वल आणि दोन मित्र
दोन मित्र जंगलातून चालले होते की त्यांना लांबून एक अस्वल त्यांच्या दिशेने येताना दिसला

झणझणीत पापडाची चविष्ट भाजी

झणझणीत पापडाची चविष्ट भाजी
दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण प्रत्येक गृहिणींसाठी हा मोठा प्रश्न असतो की त्यांनी ...

MPPEB पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज ...

MPPEB पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज करा
MPPEB पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 : मध्यप्रदेश व्यावसायिक मंडळाने म्हणजे मध्यप्रदेश ...

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि ...

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि बचावाच्या पद्धती जाणून घ्या
कोरोना विषाणू अद्याप आपल्या मधून गेला नाही आणि एक नवीन बर्ड फ्लू ने शिरकाव करून ...