रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

वाइनग्रेप उत्पादन, शेतकर्‍यांसाठी सुवर्ण संधी

नाशिक- राष्ट्रीय स्तरावरील विचार करता द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा मोठा हात आहे. परंतु गेल्या काही वर्षात गारपीट व यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु त्यावर पर्याय म्हणून टेबलग्रेपसोबतच वाइनग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत आहेत. वाइन उद्योगाच्या वाढत्या विस्तारासोबतच वाइनग्रेप पिकवत द्राक्ष उत्पादकांनाही चांगले उत्पादन मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
साधारणत: 2000 सालापासून भारतात वाइन उद्योग बहरत गेला. देशात द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने विशेषतः: महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी जागतिक दर्जाच्या द्राक्ष उत्पादनाला सुरवात केली. भारतातील उष्णप्रदेशीय (ट्रॉपिकल) विभागात मोडणार्‍या नाशिकसह सांगली, सोलापूर, पुणे सातारा या जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकातील बिजपुर, बगलकोट, बेल्जियम, गुलबर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती आहे. देशातील द्राक्ष उत्पादनाच्या जवळपास 70 टक्के वाटा या परिसरातून येतो. तर 34,000 हेक्टर परिसरात द्राक्ष शेती केली जाते. या क्षेत्रातून 10 लाख टन द्राक्ष उत्पादन केले जाते.
 
देशातील द्राक्ष उपत्पादनापैकी महाराष्ट्र राज्यात जवळपास 85 हिस्सा हा भारताचा असून महाराष्ट्रात पिकणार्‍या द्राक्षांत 60 टक्के द्राक्ष नाशिक जिल्ह्यात उत्पादित केले जातात. याशिवाय पुणे, सोलापूर व सांगली येथेही द्राक्ष लागवड केली जाते. चांगले उत्पादन मिळवून देणारे पिक म्हणून द्राक्षाची ओळख असली तरी काही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागतो. द्राक्षमळा उभारणीसाठी लागणारी मोठी गुंतवणूक, द्राक्षमळ्याच्या व्यवस्थापनासाठी लागणारा मोठा खर्च, वातावरणात होणार्‍या बदलांमुळे द्राक्ष शेतीला बसणारा फटका, निर्यातीचे अत्यल्प प्रमाण, विपणनात येणार्‍या अडचणी आदी समस्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करतात.
 
मात्र गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादकांना हमखास उत्पन्न मिळवून देण्यासाठी वाइन ग्रेपने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकीकडे टेबल ग्रेप पिकवतांना अनेक शेतकर्‍यांकडून द्राक्षमळ्यातील निम्म्या भागात वाइनग्रेपची लागवड केल्याचे आढळते. तसेच गारपीट व अन्य कारणांमुळे जरी द्राक्षमळ्याचे नुकसान झाले, तरी अशा परिस्थितीत वाइनग्रेप वाइन उत्पादनासाठी वापरात येत असल्याने शेतकर्‍यांना‍ दिलासा मिळण्यासोबत हमखास उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे.
 
वाइन उद्योगाचा वाढता विस्तार आकडेवारीतून लक्षात येतो. गेल्या वर्षी देशात 17 मिनीयन लीटर वाइनचे उत्पादन झाले. यामुळे निर्यातीचे प्रमाणही 40 टक्क्यांनी वाढले.
 
देशात वाइन ग्रहण करणारे ग्राहक साधारणत: उच्च श्रेणीतील आहेत, असे समजले जाते. दिल्ली मेट्रो आणि गोवा या ठिकाणी सुमारे 75 टक्के वाइन रिचवली जाते. मात्र अलीकडील काळात कमी दरात दर्जेदार वाइन उत्पादित होत असल्याने आता वाइन सेवन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर वाइन उद्योगही विस्तारत चालला आहे.
 
वाइनच्या वाढत्या मागणीमुळे वाइनच्या उत्पादनातही वाढत होते आहे. परिणामी वाइन उत्पादनासाठी लागणार्‍या वाइनग्रेप्सची मागणीदेखील सहाजीकरित्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मोठे वाइन उत्पादक करार शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना भरघोस व हमखास उत्पन्न वाइनग्रेपद्वारे मिळवून देतायत.
 
पुढे वाचा....

* वाइन ग्रेप करता लागणार्‍या पायाभूत सुविधा टेबल ग्रेप पेक्षा कमी लागत असल्याने जवळ जवळ २५ टक्के पेश्यांची बचत होते. 
 
* वाइन ग्रेप लागवडीकरता टेबल ग्रेप पेक्षा कमी पाणी लागते, तसेच कमी सुपीक जमिनीत देखील ही द्राक्ष चांगली उगवतात.
 
* वाइन ग्रेप्स टेबल ग्रेप्सच्या तुलनेत बळकट असल्याने त्याला कमी खतांची गरज असते. त्यामुळे खतावर होणारा खर्च वाचतो.
* टेबल ग्रेप्सची आयुष्यमर्यादा वाइन ग्रेप्स पेक्षा कमी असते. जसे की टेबल ग्रेप्स कमीत कमी दहा वर्षांचे आयुष्य आणि वाइन ग्रेप्स १५-१६ वर्षे आणि त्याहून हि अधिक वर्षे गाजून हि तितकेच उत्पन्न देत राहू शकतात. 
 
* टेबल ग्रेप्सला वातावरणाचा बसणारा फटका वाइन ग्रेप्सला तितकासा त्रास देत नाही. नुकसानग्रस्त द्राक्ष इकॉनॉमी वाइन्स मध्ये वापरता येत असल्याने त्यांना देखील भाव मिळतो.
 
* वाइन ग्रेप्सना थिनिंग, ग्रेडिंग, होर्मोन ट्रीटमेंटची गरज नसल्याने उत्पादनावर करावा लागणारा खर्च वाचतो. बॉक्स पॅकेजिंग, पेपर रॅपिंग इत्यादी प्रक्रिया वाइन ग्रेप्सकरता गरजेच्या नसल्याने प्रक्रिया शुल्कही वाचते.
 
* वाइन ग्रेप्सकचे टेबल ग्रेप्स पेक्षा ३० टक्के कमी कामगारात काम होते.
 
* टेबल ग्रेपच्या तुलनेत वाइनग्रेपला वातावरणातील बदलाचा कमी प्रमाणात फटका बसत असल्याने, तसेच गारपीटीसारख्या परिस्थितीतही वाइनग्रेप प्रभावीत होत नसल्याने शेतकर्‍यांकडूनही या प्रकाराच्या द्राक्ष लागवडीला प्राधान्य दिले जाते आहे.

 
- सुला विनीयार्डस्